राज्यातील विविध रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांची दुरुस्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुंबई - राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये दीर्घकाळापासून नादुरुस्त असलेले सीटी स्कॅन, डायलिसिस मशिन, व्हेंटिलेटर, एक्‍सरे मशिन अशी सुमारे 13 हजार विविध वैद्यकीय उपकरणे दुरुस्त करून पुन्हा वापरात आणण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये असणारी वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामग्रीच्या नादुरुस्तीमुळे आरोग्य सेवा रुग्णांपर्यंत पोचवण्यामध्ये अडचणी उद्भवतात; परंतु आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एकच संस्था असावी, असे निर्देश विभागाला दिले होते. गेल्या सहा महिन्यांत 13 हजार विविध उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली आहे. संस्थेने केलेल्या परीक्षणानुसार राज्यात एकूण 68 हजार 995 इतकी उपकरणे होती. त्यामधील जी महत्त्वाची उपकरणे नादुरुस्त होती, ती उपकरणे सेवा पुरवठादाराने तात्काळ दुरुस्त केल्याने पुन्हा कार्यान्वित झाली. त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. आतापर्यंत 5060 उपकरणांच्या दुरुस्तीसाठी नोंदणी झाली होती. त्यातील 4739 एवढी उपकरणे सेवा पुरवठादाराने दुरुस्त केलेले आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 4367, नगर 3536, पुणे 3303 तर ठाणे आणि नंदूरबार 2000 एवढ्या मोठ्या संख्येने उपकरणांची दुरुस्त करण्यात आली आहे.

Web Title: mumbai maharashtra news medical instrument repairing in hospital