राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती द्या - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या सुरू असलेल्या विविध कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. महामार्गांचे विस्तारीकरण, बायपासची कामे, उड्डाण पुलांची कामे आदींसाठी आवश्‍यक असलेल्या भूसंपादनाचा या वेळी आढावा घेण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे भूसंपादनाचे काम गतीने करण्यात यावे. काही ठिकाणी लोकांचा विरोध असल्यास त्यांच्या भावना लक्षात घेऊन आवश्‍यक ते बदल करण्यात यावेत. तसेच प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त भरीव मोबदला देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री संजय राठोड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक कुमार आदी उपस्थित होते. बैठकीस संबंधित जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

Web Title: mumbai maharashtra news national highway work devendra fadnavis