कोंबडी व दारू हेच भाजपच्या सत्तेचे अस्त्र - नवाब मलिक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई - 'भाजपने देशातील आणि राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी कोंबडी आणि दारूचा वापर केला, हे उत्तर प्रदेशचे मंत्री प्रकाश राजभर यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले असून, त्यामुळे आता भाजपला या देशातील गरीब माणूसच धडा शिकवेल,'' असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी दिला आहे.

प्रकाश राजभर यांनी "लिट्टी चोका कच्चा वोट, दारूमुर्गा पक्का वोट' असे वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या वक्तव्याबाबत खंत व्यक्‍त करताना मलिक यांनी भाजपवर टीका केली.

भाजपने देशातील आणि राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी याच अस्त्रांचा वापर केला असून, गरिबांची अशी खिल्ली उडवणाऱ्या मंत्र्याला देशातील गरीब जनता उत्तर देईल आणि यापुढे कितीही दारू वाटली तरी मतदान होणार नाही, हे गुजरात निवडणुकांनी सिद्ध झाल्याचा टोलाही मलिक यांनी लगावला.

Web Title: mumbai maharashtra news nawab malik talking