नवी मुंबई विमानतळाचे काम 'जीव्हीके'ला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सर्वाधिक बोली लावणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला देण्यात येणार आहे. हा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे विमानतळाच्या कामाला आता गती मिळणार असून, डिसेंबर 2019 पर्यंत तो कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून सिडको काम पाहत आहे.

नवी मुंबई येथे एक हजार 160 हेक्‍टर जमिनीवर सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विटप्पा स्पर्धात्मक पद्धतीने बोली प्रक्रिया राबवण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत जीएमआर एअरपोर्टस, व्हॉल्युप्टास डेव्हलपर्स (हिरानंदानी ग्रुप) व झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल एजी (व्यापारी संघ), एमआयए इन्फ्रास्ट्रक्‍चर (व्हिन्सी एअरपोर्ट व टाटा रिअल्टी यांचा समन्वय असलेली कंपनी) आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी अर्थात जीव्हीके व एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्‍त कंपनी यांनी सहभाग घेतला होता. तपशीलवार मूल्यांकनाच्या आधारे प्रकल्प संनियंत्रण व अंमलबजावणी समितीने चार अर्जदारांपैकी उच्चतम अधिमूल्य प्रस्ताव देणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीची सवलतधारक म्हणून निवड करण्याची शिफारस केली आहे. त्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सुरक्षा बाबींची पूर्तता करणाऱ्या आणि प्रकल्पाच्या 12.6 टक्के महसुलाचा समभाग सिडकोला देणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीची निवड करण्यात आल्याने सिडकोला एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 12.6 टक्के महसुली समभाग आणि 26 टक्के प्राधिकरण समभाग मिळणार आहेत.

- "हायब्रीड ऍन्युइटी'च्या धोरणात सुधारणा
- किमान 50 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांसाठी निविदा काढणार
- "आरे'ची उत्पादने इतर दुकाने व मॉल्समध्ये मिळणार
- "नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्‍सप्रेस वे लिमिटेड' स्थापण्यास मान्यता
- पंढरपूर मंदिर समितीत आता सहअध्यक्ष पद

Web Title: mumbai maharashtra news new mumbai airport work give to GVK