वडिलांच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नाही - अनुज लोया

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - 'वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही. त्यामुळे कृपया मला आणि आमच्या कुटुंबीयांना या प्रकरणात ओढू नका,'' अशी विनंती न्या. बी. एच. लोया यांचा मुलगा अनुज लोया यांनी केली आहे.

मुंबई - 'वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही. त्यामुळे कृपया मला आणि आमच्या कुटुंबीयांना या प्रकरणात ओढू नका,'' अशी विनंती न्या. बी. एच. लोया यांचा मुलगा अनुज लोया यांनी केली आहे.

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अनुज यांनी बाजू मांडली. 'कुटुंबाला या सर्व परिस्थितीचा त्रास होतोय. या प्रकरणात अगोदर संशय वाटला होता; मात्र नंतर सर्व स्पष्ट झाले. त्यामुळे आमचा कुणावरही संशय नाही. या प्रकरणात कृपया आम्हाला ओढू नका,'' अशी कळकळीची विनंती अनुज यांनी केली.

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यावरून वादंग माजला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन व्यवस्थित काम करत नसल्याचा आरोप केला. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण हेही न्यायमूर्तींच्या नाराजीचे कारण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगोई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Web Title: mumbai maharashtra news no doubt about the death of father