डॉ. आंबेडकरांना 'ते' रामभक्तही ठरवतील: प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

दलितांच्या मतांवर भाजपचा डोळा
केवळ दलितांची मते मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ही खेळी केली असल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. हा आदेश आत्ताच का दिला, असा सवाल उपस्थित करून राम मंदिर प्रश्नावर भाजप सरकारला अपयश आल्यानेच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप आनंदराज यांनी केला.

मुंबई - येत्या लोकसभा निवडणुकाच्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते, अशी घोषणा मोदी सरकार करू शकते, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.

उत्तर प्रदेश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्ये त्यांच्या वडिलांचे रामजी हे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. आंबेडकर हे भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करत असल्याचा दाखला देत उत्तर प्रदेश सरकारने भीमराव रामजी आंबेडकर असे नाव यापुढे लिहिले जाईल, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले.

दलितांच्या मतांवर भाजपचा डोळा
केवळ दलितांची मते मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ही खेळी केली असल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. हा आदेश आत्ताच का दिला, असा सवाल उपस्थित करून राम मंदिर प्रश्नावर भाजप सरकारला अपयश आल्यानेच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप आनंदराज यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मराठी मध्येच सही करत. भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करताना ते बी. आर. आंबेडकर असे लिहीत.
- प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे नेते

Web Title: mumbai maharashtra news prakash ambedkar bjp politics