पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुंबई - दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडॉल्फ हिटलरचा मार्ग पत्करावा. यामध्ये शिवसेनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले. काश्‍मीरमध्ये बिघडत असलेल्या परिस्थितीबाबत त्यांनी या वेळी चिंता व्यक्त केली.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काश्‍मीरमधील परिस्थिती बदलेल आणि खुल्या वातावरणात राहता येईल, स्थलांतरित झालेले काश्‍मिरी नागरिक पुन्हा परततील, असे तेथील नागरिकांना वाटत होते; मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी टीकाही राऊत यांनी या वेळी केली. ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिटलरचा आत्मा शरीरात शिरल्यास आपण दहशतवाद नष्ट करू, असे नेहमी सांगत असत. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यानंतर त्या वक्तव्याची प्रकर्षाने आठवण होत आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात नागरिक दहशतवादाला कंटाळले होते. त्यामुळेच भाजपला भरभरून मते मिळाली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले; मात्र परिस्थिती नियंत्रित होण्याऐवजी आणखीनच बिघडत आहे. पाकिस्तानी सैनिक सीमेवर रोजच भारतीय जवान आणि नागरिकांचा बळी घेत आहेत. ही परिस्थिती भविष्यात बदलेल, अशी कोणतीही चिन्हे नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

काश्‍मीरमधील सामाजिक जीवन, आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कटली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस काश्‍मीर आपल्या हातून निसटेल.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना

Web Title: mumbai maharashtra news Prime Minister to get Hitler path