पुणे-कोल्हापूर महामार्ग डिसेंबरअखेर सहापदरी!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

मुंबई - पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात राज्य सरकार सहसा हस्तक्षेप करत नाही. लिंब येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, तिथे एप्रिलमध्ये कोणताही अपघात झाला नाही, असेही राज्यमंत्री पोटे पाटील यांनी सांगितले. कॉंग्रेसचे आनंदराव पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते. सातारा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. लिंबखिंडीतील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये अपघात होऊन जीवितहानी झाली होती, असे तारांकित प्रश्‍नाद्वारे कॉंग्रेसचे आनंदराव पाटील यांनी म्हटले होते.

Web Title: mumbai maharashtra news pune-kolhapur highway 6th lane