रत्नागिरी व सोलापुरातील तंत्रनिकेतन बंद करणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्यात सहा ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये उभारण्याचा सरकारचा मानस होता. मात्र, रत्नागिरी व सोलापूर येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य प्रणिती शिंदे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार एकाच परिसरात तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय देता येत नाही. खासगी महाविद्यालयातील शुल्क विद्यार्थ्यांना परवडत नाही म्हणून राज्यात सहा ठिकाणी तंत्रनिकेतनऐवजी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येणार होते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेता या दोन ठिकाणची तंत्रनिकेतन बंद होणार नाहीत, अशी ग्वाही तावडे यांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news Ratnagiri and Solapur will not be able to stop the technicolysis