बीटीच्या बियाण्याबाबत पुनर्विचार व्हावा - खोत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - बीटी कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून, शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नोंदविले आहे.

त्यामुळे बीटी कापसाच्या बी. जी.-2 बियाण्यांना वाणिज्यिक मान्यता देण्याबाबत पुनर्विचार करावा, असे निवेदन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना पाठविले आहे.

राज्यातील सुमारे 41 लाख हेक्‍टर क्षेत्र कापूस पिकाच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी अंदाजे 98 टक्के लागवड ही बीटी कापसाची केली जाते. राज्यात खरीप हंगामामध्ये सुमारे एक कोटी 65 लाख बीटी कापसाच्या बियाण्यांची पाकिटे वापरली जातात. कापूस लागवडीसाठी बहुतांश शेतकरी बीटी कापसाची लागवड करतात. केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने बी.जी.-2 तंत्रज्ञानावर आधारित बियाणे उत्पादनाची परवानगी बियाणे उत्पादकांना दिली आहे. परंतु सद्यःस्थितीत बीटी कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून, शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

Web Title: mumbai maharashtra news reconsider BT seed