शरद पवार यांच्या संसदीय कार्याचा आज गौरव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

दोन्ही सभागृहात प्रस्ताव चर्चेला येणार
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सलग 50 वर्षांची संसदीय कारकीर्द आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कार्यांचा गौरव करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता.4) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे.

शरद पवार यांनी विधिमंडळ ते संसद असा सलग 50 वर्षे संसदीय प्रवास केला आहे. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी एकदाही पराभव स्वीकारला नाही. गणपतराव देशमुख यांनी 50 वर्षे विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. या दोघांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव दखल करण्यात येणार आहे. पवार यांच्याप्रमाणे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गुणगौरवाचा प्रस्ताव कॉंग्रेसकडून कामकाजात दाखल करण्यात आला होता. यावरून कॉंग्रेस -राष्ट्रवादी पक्षात खडाजंगी झाली होती.

Web Title: mumbai maharashtra news sharad pawar parliamentary work pride