अलाहाबाद महापालिकेत "करून दाखवले' - आदित्य

अलाहाबाद महापालिकेत "करून दाखवले' - आदित्य

मुंबई - अलाहाबाद (उत्तर प्रदेश) महापालिकेत शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आल्याने युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी "करून दाखवले' असे ट्विट केले आहे.

अलाहाबादमधील प्रभाग क्रमांक 40 मधून शिवसेनेचे उमेदवार दीपेश यादव निवडून आले आहेत. त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट आदित्य यांनी केले आहे. "शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशात. करून दाखवलं. करून दाखवणार. ही तर सुरुवात आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे. त्याचबरोबर हिंदीत मतदारांचे आभारही मानले आहेत. उत्तर प्रदेशच्या 16 शहरांत झालेल्या सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांचा एकमेव उमेदवार निवडून आला आहे.

भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर सर्व निवडणुका लढण्याचा सपाटा लावला आहे. गुजरातमध्ये शिवसेना अनेक वर्षांपासून निवडणूक लढत आहे. मात्र, अजून यश आलेले नाही. यावेळीही गुजरात विधानसभेतील 50 जागा शिवसेना लढवत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकाही लढवल्या होत्या. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोव्यातही शिवसेनेने हवा निर्माण केली होती. मात्र, अपयश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com