पर्यावरण खात्याची शिवस्मारकाला परवानगी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - अरबी समुद्रात उभ्या राहणाऱ्या शिवस्मारकाची उंची 192 मीटर्स वरून 210 वर नेण्यास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन परिषदने (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथोरिटी) परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे शिवस्मारक जगातील सर्वांत उंच पुतळा ठरणार आहे.

चीन येथे सध्या सर्वांत उंच पुतळा असून, शिवछत्रपती आता सर्वाधिक उंचीवर विराजमान झालेले उत्तुंग नेते ठरतील. महाराष्ट्र सरकारने छत्रपतींचा पुतळा जगात सर्वांत उंच ठरावा यासाठी उंची वाढविण्याची परवानगी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडे मागितली होती. त्यांनी यासंदर्भात सागरी व्यवस्थापन परिषदेला काही आक्षेप आहेत काय, असे विचारले होते. त्यांनी उंची वाढविण्यास परवानगी दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. 84 मीटर उंचीच्या चबुतऱ्यावर 126 मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला जाणार आहे. एकत्रित उंचीमुळे हा पुतळा जगातील सर्वांत उंच पुतळा ठरेल. अरबी समुद्रातले शिवस्मारक पर्यावरणस्नेही असेल याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Web Title: mumbai maharashtra news shivsmarak permission by environment department