समृद्धी महामार्गासाठी दक्षिण कोरियाचे सहकार्य

समृद्धी महामार्गासाठी दक्षिण कोरियाचे सहकार्य

मुंबई - महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी दक्षिण कोरियासोबत आज सोल येथे सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण कोरियाचे भूमी, पायाभूत सुविधा आणि परिवहन मंत्री किम ह्यू-मी यांच्याशी विविध प्रकल्पांच्या उभारणीबाबत विस्ताराने चर्चा केली. यासोबतच नागपूर-मुंबई समृद्धी कॉरिडॉरच्या उभारणीसाठी दक्षिण कोरियाने सहकार्य करण्यास उत्सुकता दर्शविली आहे.

दक्षिण कोरियाच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचे आज सोल येथे आगमन झाले. त्यानंतर किम ह्यू-मी यांच्याशी या शिष्टमंडळाने संवाद साधला. महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी या वेळी श्रीमती किम यांना माहिती दिली. औद्योगिक विकासातही महाराष्ट्र अग्रेसर असून, भारतात झालेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणूक राज्यात झाली असल्याचे सांगून दक्षिण कोरियातील उद्योगसमूहांनी राज्यातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दक्षिण कोरियन नेत्यांनी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत विशेष रुची दर्शविली. त्यानंतर राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी या वेळी उभय पक्षांत सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार स्मार्ट सिटी, महामार्ग, विमानतळ, मेट्रो आदी महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीत राज्याला दक्षिण कोरियाचे सहकार्य लाभणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com