संपात सहभागी झाल्यास एसटी कामगारांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - सातवा वेतन आयोग लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने संप करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी 26 व 27 मे रोजी राज्यभर मतदान घेतले जाणार आहे. एसटी महामंडळाने संपात सहभागी झाल्यास योग्य वेळी नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

संपावर जावे की नाही, याबाबत एसटीच्या हद्दीत मतदान घेता येणार नाही, असा नियम दाखवत याबाबतही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे. कामगारांनी मतदान करू नये यासाठीही एसटीच्या राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सांगितले की, संपावर गेलेल्या कामगारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसने या संपाला पाठिंबा दिलेला नाही. आपली मान्यता टिकवण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची ही धडपड आहे, अशी टीका कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना थांबावे लागेल. त्यामुळे आता संप करणे योग्य ठरणार नाही, असे बरगे म्हणाले.

कामगार संघटनेने करार करण्यासाठी पुढे यावे, असे वारंवार सांगण्यात आले आहे. तरीही संघटना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहे. आताही करार करण्यासाठी एसटी प्रशासन तयार आहे.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष

Web Title: mumbai maharashtra news st employee crime by strike involve