दहावीचा आज ऑनलाईन निकाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई - राज्य बोर्डचा दहावीचा निकाल उद्या (ता.13) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यभरातून तब्बल 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच एसएमएस वर विषयनिहाय गुण पाहाता येणार आहे. तर, बुधवारी (ता.14) गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी अर्ज करता येणार आहे.

अनेक दिवसांपासून ताटकळेल्या दहाविच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. उद्या हा निकाल जाहीर होणार असून नऊ लाख 89 हजार 908 मुले आणि सात लाख 76 हजार 190 मुली या परीक्षेला बसले आहेत. गुणपत्रिका मिळण्याची तारीख उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरिक्षा
दहावीत अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जूलै- ऑगस्ट मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची सुरवात 19 जून पासून होईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सचिव के.बी.पाटील यांनी दिली.

निकाल येथे पाहता येणार
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.knowyourresult.com
www.rediff.com/exam
www.jagranjosh.com

बीएसएनएल मोबाईवर - 67766 या क्रमांकावर MHSSC
(स्पेस)(बैठक क्रमांक)
आयडीया, व्होडाफोन,रिलायन्स,टाटा डोकोमा -58888111 या क्रमांकावर
MAH10(स्पेस) (बैठक क्रमांक)

Web Title: mumbai maharashtra news today ssc result online