आता मधापासून वाइन; सरकारची परवानगी

दीपा कदम
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई - फुले आणि मधापासून वाइन बनविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चिकू, आंबा, गुलाबापासून वाइन तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून, या फुलांच्या वाइनमध्येदेखील मधाचा वापर केला जाणार आहे. 

मुंबई - फुले आणि मधापासून वाइन बनविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चिकू, आंबा, गुलाबापासून वाइन तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून, या फुलांच्या वाइनमध्येदेखील मधाचा वापर केला जाणार आहे. 

वाइन तयार करण्यासाठी महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य असणार आहे. फुले आणि फळांमध्ये मधाच्या वापरामुळे आंबवण्याची प्रक्रिया ही अधिक जलद गतीने होत असल्याने फुले आणि फळांच्या वाइनमध्येदेखील मध वापरता येणार आहे. शिवाय मधामध्ये नैसर्गिक साखर असल्याने या वाइनमध्ये साखरेचे प्रमाण इतर वाइनच्या तुलनेत कमी असणार आहे. द्राक्षांपासून वाइन बनविण्यामध्ये राज्याच हिस्सा देशात ९० टक्‍के आहे. राज्याने अलीकडेच बीअर आणि वाइन बनविणे नियम १९६६ मध्ये बदल केले आहेत. ज्यामध्ये स्पीरिटस किंवा अल्कोहोलशिवाय फळ, फुले आणि मधापासून वाइन तयार करण्यासाठी परवानगी दिली. पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात फुले आणि फळांपासून वाइन तयार केली जाते. पाणी आणि ईस्ट वापरून ही वाइन तयार केली जात होती; मात्र या वाइनना परवानगी नसल्याने अशाप्रकारच्या वाइनना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नव्हती. आता मध वापरून ही वाइन तयार करता येणार आहे. मधापासून वाइन तयार करण्यात आल्यानंतर दोन महिन्यांनंतर किंवा त्यानंतर कधीही घेतली तर तिची चव अधिक वाढणार आहे.

Web Title: mumbai maharashtra news wine create by honey government permission