शिवसेनेशिवायही सरकार स्थिर - आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये आणि जरी शिवसेना बाहेर पडली तरी राज्य सरकार स्थिर राहील, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केला. मुंबईतील दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवली गेली, त्या वेळी ते बोलत होते.

'शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आमदारांची गरज भासल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला पाठिंबा देण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीनेही पाठिंबा नाही दिला; तरी सरकार स्थिर राहण्यासाठी 15 आमदारांची गरज आहे. त्यासाठी 15 आमदार सहज पाठिंबा देतील, कारण तीन वर्षांत पुन्हा निवडणूक घेण्याची आमदारांची इच्छा नाही,'' असेही आठवले म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता नारायण राणे यांनी "रिपाइं'त यावे, अशी ऑफरही आठवलेंनी दिली. राणे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा "रिपाइं'ला होईल, असे ते म्हणाले.

Web Title: mumbai maharashtra news without Shiv Sena government is stable