अखेर राज्य खड्डेमुक्‍तीच्या दिशेने

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्याची अनेकदा राज्य सरकारने दिलेली डेडलाइन अनेकदा संपली असताना तब्बल चार महिन्यांनंतर राज्यातील खड्डे जवळपास बुजविल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली. राज्यात आतार्यंत तब्बल 98 टक्‍के खड्डे बुजविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्याची अनेकदा राज्य सरकारने दिलेली डेडलाइन अनेकदा संपली असताना तब्बल चार महिन्यांनंतर राज्यातील खड्डे जवळपास बुजविल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली. राज्यात आतार्यंत तब्बल 98 टक्‍के खड्डे बुजविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात राष्ट्रीय महामार्ग, मुख्य राज्य महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यांना जोडणारे मार्ग अशा चार प्रकारच्या रस्त्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणावर आहे. पावसाळयात राज्यातील रस्त्यांची भीषण दुरावस्था झाल्याने याविषयी राज्य सरकारवर सातत्याने टीका होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांची पाहणी केली.

खड्ड्यांच्या डागडुजीसाठी पाटील यांनी मंत्रालयातील दालनात "वॉर रूम' सुरू केली असून, तेथे दोन शिफ्टमध्ये नऊ अधिकारी काम करत आहे. या कक्षात संगणकाचे दोन मोठे पडदे लावले असून, एका पडद्यावर राज्यातील सुरू असलेल्या कामांचा तपशील दिसून येतो. दुसऱ्या पडद्यावर चंद्रकांत पाटील ट्विटरवर उपलब्ध असून, राज्यातील खड्डे बुजविण्यात येत असल्याच्या तपशिलाबरोबरच राज्यभरातील अधिकारी रस्त्यांच्या कामांची छायाचित्र अपलोड करत असतात. याच ट्विटरवर नागरिकांच्या तक्रारीही येत असल्याने "वॉर रूम'मधील अधिकारी त्याची दखल घेत तक्रारदाराला माहिती देत आहेत.

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर 2017 पर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्‍त होतील, अशी अंतिम मुदत दिली होती; मात्र ही मुदत हुकली असताना आतापर्यंत राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील 97.93 टक्‍के बुजविण्यात आले आहेत. उर्वरित खड्डे येत्या आठवडाभरात बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती "वॉर रूम'मधून देण्यात आली.

राज्यातील रस्ते व खड्ड्यांचा तपशील
विभाग राज्याच्या अखत्यारीतील रस्त्यांची लांबी खड्डे पडलेले अंतर खड्डे बुजविल्याची टक्‍केवारी

मुंबई 8634 किलोमीटर 5132 किलोमीटर 99.77
पुणे 21022 किलोमीटर 14709 किलोमीटर 96.70
नाशिक 16634 किलोमीटर 11753 किलोमीटर 99.99
औरंगाबाद 20162 किलोमीटर 12107 किलोमीटर 94.73
अमरावती 11260 किलोमीटर 5942 किलोमीटर 100
नागपूर 12276 किलोमीटर 7066 किलोमीटर 98.96
एकूण 89990 किलोमीटर 56708 किलोमीटर 97.93

Web Title: mumbai maharashtra road hole state