Maharashtra ST : एसटीचे ७५ वर्षात पदार्पण; वर्धापन दिन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार साजरा

१ जून १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पुर्ण होत आहेत.
ST
STSakal

मुंबई - १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली फेरी अहमदनगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्ताने एसटीच्या 'अमृतमहोत्सवी' वर्धापन दिन सोहळा ३ जून रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यंशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार असून, प्रमुख पाहूणे म्हणुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.

याबरोबरच या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, एसटीचे सदिच्छा राजदूत जेष्ठ नेते मकरंद अनासपूरे हे देखिल उपस्थित राहणार असल्याची माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आहे. विशेष म्हणजे एसटीच्या ७५ वर्षाचा इतिहास सांगणा-या एसटी विश्वरथ या वातानुकुलित फिरत्या बसचे उद्घाटन देखिल मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी होणार आहे.

ST
Sanjay Raut : संजय राऊतांचे थुंकणे सापडले वादात; राजकीय वर्तुळातून टिका

या सोहळयाच्या निमित्ताने

- एसटीच्या कॉफीटेबल पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे

- २५ वर्षापेक्षा जास्त सुरक्षित सेवा बजावणा-या ५ चालकांचा सपत्निक सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

- कोरोना महामारी नंतर गेल्या वर्षभरात उल्लेखनिय कामगिरी करणा-या राज्यातील पहिल्या तीन विभांगाचा व २५० आगारापैकी गटनिहाय ९ आगारांचा सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

- याबरोबरच दुररर्शी प्रणालिव्दारे राज्यातील विविध बसस्थानकांचे भुमिपुजन, उद्घाटन आणि बसस्थानक परिसराचे कॉक्रिटिकरण या कामाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com