बुलेट ट्रेनच्या वेगाने सरकारचा कारभार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 एप्रिल 2018

सहकार व पणन विभागाकडून २६, तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून एकूण १७ जीआर काढण्यात आले. कृषी, पशुसंवर्धन व मत्सव्यवसाय विभागाने १४ जीआर काढले आहेत, तर आज मंत्रालयात लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४५६ प्रकरणे निकाली काढली.

मुंबई - सरत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने तब्बल १९२ शासन निर्णय (जीआर) काढले आहेत. सर्वाधिक शासन निर्णय सहकार व पणन विभागाकडून काढण्यात आले आहेत.

सहकार व पणन विभागाकडून २६, तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून एकूण १७ जीआर काढण्यात आले. कृषी, पशुसंवर्धन व मत्सव्यवसाय विभागाने १४ जीआर काढले आहेत, तर आज मंत्रालयात लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४५६ प्रकरणे निकाली काढली.

अनाथांना एक टक्का आरक्षण
पुणे - राज्यातील अनाथ मुलांसाठी सरकारी योजना आणि नोकऱ्यांमध्ये एक टक्का जागा राखीव ठेवण्याची निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सोमवारपासून (ता.२) सुरू करण्यात आली आहे. यानुसार अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गाच्या कोट्यातील एक टक्का जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र याचा लाभ घेण्यासाठी बालगृह किंवा जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्याचे ‘अनाथ प्रमाणपत्र’ (ऑर्फन सर्टिफिकेट) सादर करणे बंधनकारक असणार आहे. 

राज्य मंत्रिमंडळाने अनाथांसाठी एक टक्के आरक्षण देण्याचा निर्णय १७ जानेवारी २०१८ रोजी घेतला होता.

Web Title: mumbai maharashtrra news government work GR