एकनाथ खडसेंचा संभाव्य विस्तारात सहभाग धूसर!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - केंद्रातील विस्तारानंतर राज्यातील विस्तार अपेक्षित असून यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा सहभाग धुसर झाला आहे. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणावरून राजीनामा द्याव्या लागलेल्या खडसे यांना वर्ष उलटून गेले तरीही मंत्रिमंडळ सहभागाची प्रतीक्षा लागली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सध्या सुरू असताना न्यायालयाने खडसे यांच्या मालमत्तेसंदर्भात सरकारने कोणती भूमिका घेतली अशी विचारणा एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान केली आहे. त्यामुळे खडसे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती झोटिंग यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आला असून अद्याप तो गुलदस्तात आहे. त्यातच न्यायालयाने सरकारकडे मालमत्तेबाबत विचारणा केल्याने खडसे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
Web Title: mumbai maharshtra news eknath khadse