Crime News: मुंबईत थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: मुंबईत थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये...

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देश हादरला. ही घटना ताजी असतानाच अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मिरा रोडमध्ये लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा त्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करत असे. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्यही पोलीसांनी जप्त केले आहेत. मनोज साने (56 वर्ष) असं या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची होती.(Marathi Tajya Batmya)

मीरा भाईंदर येथे उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तेथील हा सर्व प्रकार आहे. पोलिसांनी आरोपीली अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे देखील त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत.

मागच्या तीन वर्षांपासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी दुर्गंधी येणाऱ्या घरात प्रवेश केला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.(Latest Marathi News)

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नयानगर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची विल्हेवाट लावली.(Marathi Tajya Batmya)

हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्यदेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी हा फ्लॅट उघडला आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Latest Marathi News)