एसटीच्या ताफ्यात लवकरच 1200 शिवशाही बस

एसटीच्या ताफ्यात लवकरच 1200 शिवशाही बस

मुंबई - खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गांवर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत. यामध्ये दोन ते तीन महिन्यांत आणखी 1 हजार 200 बस दाखल होणार आहेत. या बस वातानुकूलित असून, त्यामध्ये आरामदायी आसने आणि एलईडी स्क्रिन बसविण्यात आल्या आहेत.

एसटी महामंडळाने खासगी प्रवासी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी वातानुकूलित बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे शिवशाही बसचा आराखडा तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एसटीच्या ताफ्यात 16 शिवशाहीर बस दाखल झाल्या आहेत. उर्वरित बससाठी निविदा प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांमध्ये 1 हजार 200 शिवशाही बस दाखल होतील, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी दिली.

वातानुकूलित बस, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायी सीट, टू बाय टू आसनव्यवस्था, मोबाइल चार्जर, सीसीटीव्ही, अनाउन्समेन्ट सिस्टिम अशी या बसची वैशिष्ट्ये आहेत. या बसची आसनक्षमता 43 आहे. सध्या या बस मुंबई-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, रत्नागिरी-कोल्हापूर व मुंबई -अलिबाग मार्गावर सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com