निम्न तापी लाभक्षेत्रात पाच उपसा सिंचन योजना 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसासिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे 621.68 कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्‍यातील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. 

तापी नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 502.09 दलघमी एवढा पाणीसाठा होणार असून 63 हजार 565 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात या प्रकल्पात लाभधारक शेतकऱ्यांनी वैयक्तिक अथवा सामूहिक पद्धतीने स्वत:च्या खर्चाने पाणी उपसा करून शेतीसाठी वापरण्याची तरतूद आहे. मात्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाणी उपसा करणे शक्‍य नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाच्या क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविण्यासाठी पाच उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता.

Web Title: mumbai news agriculture irrigation scheme