ऑटोरिक्षा व टॅक्‍सीवर जीपीएस यंत्रणा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोरिक्षा व टॅक्‍सीमध्ये जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. 

मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोरिक्षा व टॅक्‍सीमध्ये जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. 

ठाणे परिसरात 36 हजार परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. तसेच 30 हजार ऑटोरिक्षाधारकांकडे स्मार्ट कार्ड आहेत. मागेल त्याला परवाना हे धोरण सरकार राबवत आहे; मात्र यासंदर्भात अधिक माहिती घेतली जाईल. नौपाडा पोलिस स्थानकामधील घटनेनंतर पोलिस व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली असून, 7212 ऑटोरिक्षा तपासण्यात आल्या. 104 ऑटोरिक्षांचा परवाना निलंबित केला असून, 108 रिक्षाचालकांचा परवाना निलंबित केला आहे. 2016-17 मधून ठाण्यामधून 17 हजार वाहने दोषी आढळली, तर 353 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. 555 लोकांकडे परवाने नसल्याचे आढळले. 3 कोटी 47 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य किसन कथोरे, संग्राम थोपटे, संजय केळकर यांनी सहभाग घेतला.

Web Title: mumbai news auto rickshwa taxi GPS Ranjit Patil