बाबूराव पराडकर यांचे पराडला स्मारक - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई - हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पराड या जन्मगावी राज्य सरकारच्या वतीने त्यांचे स्मारक बनविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले. "वर्षा' निवासस्थानी मुंबई प्रेस क्‍लब आणि काशी पत्रकार संघाचे हिंदी पत्रकारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या वेळी ते बोलत होते. 

पराडकर यांचे स्मारक बनविण्याची मागणी शिष्टमंडळाने या भेटीच्या प्रसंगी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, की स्मारक उभारणीचा सर्व खर्च सरकार करेल. हे स्मारक शाश्वत, चिरंतन व्हावे तसेच स्मारकाच्या कायमस्वरूपी देखभाल, दुरुस्तीसाठी आवश्‍यक तरतुदीचा सर्वंकष आराखडा पत्रकार संघाने तयार करावा. तसेच शिष्टमंडळातील सदस्यांनी कालच पराड येथे भेट दिली असता, स्मारक होणार असल्याचे समजल्यावर ग्रामस्थांमध्येही उत्साह आहे. ग्रामस्थांनी स्मारकासाठी जागा देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

Web Title: mumbai news babura paradkar Maharashtra CM