खाद्यपदार्थ नेण्यावर चित्रपटगृहांमध्ये बंदी का?

खाद्यपदार्थ नेण्यावर चित्रपटगृहांमध्ये बंदी का?

मुंबई - राज्यभरातील मल्टिप्लेक्‍ससह अन्य चित्रपटगृहांमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना खाद्यपदार्थ नेण्यासाठी मनाई का केली जाते, याबाबत तीन आठवड्यांत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. 

सामाजिक कार्यकर्ते जैनेंद्र बक्षी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायाधीश आर. एम. बोर्डे व राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची तेथील सुरक्षारक्षक तपासणी करतात. त्या वेळी प्रेक्षकांकडील खाद्यपदार्थ ते जबरदस्तीने काढून घेतात. यामागे कोणते कारण आहे. अशा प्रकारे बंदी करण्याची तरतूद कायद्यात आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. 

चित्रपटगृहांमध्ये ज्येष्ठ नागरिकही येतात. त्यांना जंक फूड खाल्ल्याने त्रास होत असतो; शिवाय चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध असलेले पदार्थही महाग असतात आणि ते सर्वसामान्यांना परवडणारे नसतात, असे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com