बंदमुळे वाहतूकदारांना दोन हजार कोटींचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईसह राज्यातील वाहतूकदारांना बसला. त्यांचे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. किरकोळ व्यापाऱ्यांचे 700 कोटींचे नुकसान झाले. इंधनविक्री न झाल्यामुळे सरकारचा एक हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला. 

राज्यातील 12 लाख अवजड वाहने दिवसभर उभी करून ठेवल्याने दोन हजार कोटींचे नुकसान झाले, असा दावा ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसने केला. 12 लाख अवजड वाहनांसाठी 24 कोटी लिटर डिझेल खरेदी केले जाते. त्यातून सरकारला कर स्वरूपात एक हजार कोटी रुपये मिळतात. हे उत्पन्न बुडाले, असा दावाही संघटनेने केला. 

महाराष्ट्रात सुमारे 35 लाख आस्थापने आहेत. यामध्ये सरासरी दररोज दोन हजार कोटींची उलाढाल होते. बुधवारी बहुतांश ठिकाणी सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत. त्यांचे नुकसान झाल्याची माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिली. दक्षिण मुंबईतील कापड बाजार आणि घाऊक बाजार दुपारपर्यंत सुरू होते, मात्र आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम झाला आणि ग्राहकांची वर्दळ कमी झाली. परिणामी दुकाने उघडी असूनही व्यवसाय झाला नाही, असे शहा यांनी सांगितले. दिवसभरात व्यावसायिकांचे सुमारे 700 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती शहा यांनी दिली.

Web Title: mumbai news band maharashtra band transport