काळ्या काचांच्या वाहनांविरोधात विशेष मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

नवी मुंबई - वाशी आणि जुईनगर येथील दरोड्याच्या घटनांनंतर वाहतूक पोलिसांनी आता काळ्या काचा लावून फिरणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या मोहिमेत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरही कारवाई केली जाणार आहे. अस्पष्ट नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारपासून (ता. १६) ही मोहीम सुरू झाली आहे. 

चार चाकी वाहनांच्या खिडकीच्या काचा काळ्या करणे, अस्पष्ट नंबर प्लेट व विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर या मोहिमेत कारवाई करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. वाहनाच्या काचांना लावलेली काळी फिल्म काढण्याचे व खराब झालेल्या नंबर प्लेट बदलण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Web Title: mumbai news campaign against black glass vehicles