कर्करोगाची चाचणी सक्तीची करा - वेंकया नायडू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - ऍडव्हान्स कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्ण हे उपचारांनंतर पूर्ण बरे होऊ शकतात. यासाठी आजार बळावण्यापूर्वी होणाऱ्या कर्करोगाची चाचणी आणि उपचार ही काळाची गरज आहे. सरकारने ही तपासणी ठराविक वयानंतर सक्तीची करावी, असे उपराष्ट्रपती वेंकया नायडू यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये आज झालेल्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी कर्करोगाच्या देशातील आकडेवारीचा आधार घेतला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीचा आधार घेत त्यांनी कर्करोगाची आकडेवारी मांडली. 2016 मध्ये कर्करोगाच्या रुग्णांचा अपेक्षित आकडा 14.5 लाख होता. प्रत्यक्षात 17.3 लाख रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. 7.36 लाख रुग्णांचा मृत्यू होईल, असा अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात 8.8 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. अवघे 12.5 टक्के रुग्ण आजाराच्या पहिल्या टप्प्यात उपचारांसाठी डॉक्‍टरांकडे जातात. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे आणि पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे; असे आकडे मांडत त्यांनी कर्करोगाची चाचणी सक्तीची आणि उपचार वेळेत होण्याची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: mumbai news cancer test Venkaiah Naidu