विमानतळबाधितांना प्रोत्साहन भत्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादित केलेल्या आणि त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेंतर्गत भूखंड वाटपासोबतच बांधकाम अनुदान व घरभाडे यांसारखे इतर लाभ देण्यात येत आहेत. याशिवाय प्रकल्पबाधित बांधकामधारकांना बांधकाम पाडल्यानंतर विशेष प्रोत्साहन भत्ता देण्यास सरकारने मान्यता दिली असून लवकरात लवकर स्थलांतरित होणाऱ्या बाधितांना मुदतनिहाय भत्ता देण्याची योजना सिडकोतर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता विमानतळबाधितांना जास्त फायदा होईल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित बांधकामधारकांना बांधकाम अनुदानाशिवाय प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. जे प्रकल्पबाधित ३१ मार्चपर्यंत बांधकामे पाडतील त्यांना बांधकाम अनुदानाव्यतिरिक्त पाडलेल्या बांधकामासाठी ५०० रुपये प्रतिचौरस फूट, ३० एप्रिलपर्यंत बांधकामे पाडणाऱ्यांना ३०० आणि ३१ मेपर्यंत बांधकाम निष्कासित करतील त्यांना शंभर रुपये प्रतिचौरस फूट असे हे पैसे देण्यात येणार आहेत. जूननंतर बांधकाम पाडणाऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही. त्यांना केवळ बांधकाम अनुदानाचे पैसे मिळतील.

विमानतळ प्रकल्पबाधित बांधकामधारकांना सरकारच्या निर्णयानुसार भूखंड व इतर आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत. इतर आर्थिक लाभांतर्गत बांधकाम अनुदान प्रतिचौरस फूट एक हजार रुपये, एकरकमी निर्वाह भत्ता ३६ हजार, एकरकमी आर्थिकसाह्य म्हणून एक लाख २४ हजार ५००, वाहतुकीसाठी अर्थसाह्य म्हणून ५० हजार आणि विमानतळ कंपनीची स्थापना झाल्यावर दहा रुपये दर्शनी मूल्याचे शंभर समभाग दिले आहेत.

प्रकल्पबाधित बांधकामधारकांच्या बांधकाम अनुदानात वाढ करावी, अशी मागणी विमानतळ प्रकल्पबाधित पुनर्वसन समितीने केली होती.

Web Title: mumbai news cidco airport