काय आहे 'मुख्यमंत्री फेलोशिप'? माहिती घ्या 'सकाळ'च्या व्हिडिओतून
'मुख्यमंत्री फेलोशिप' अनेक तरुणांना महाराष्ट्राची जडणघडण करण्याची संधी मिळत आहे. जून 2015 मध्ये मुख्यमंत्र्यांनी तरुण मंडळींचा सल्ला गंभीरपणे घेऊन "मुख्यमंत्री फेलोशिप योजना' अमलात आणली आहे.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या हुशार व कल्पक तरुणांना प्रत्यक्ष प्रशासनात आणण्याचा एक अभिनव उपक्रम 'मुख्यमंत्री फेलोशिप'च्या माध्यमातून राबवला आहे. या उपक्रमाविषयी सकाळने थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन 'मुख्यमंत्री फेलोशिप' विषयी माहिती जाणून घेतली.
'मुख्यमंत्री फेलोशिप' अनेक तरुणांना महाराष्ट्राची जडणघडण करण्याची संधी मिळत आहे. जून 2015 मध्ये मुख्यमंत्र्यांनी तरुण मंडळींचा सल्ला गंभीरपणे घेऊन "मुख्यमंत्री फेलोशिप योजना' अमलात आणली आहे.
या उपक्रमाविषयी विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोसे यांनी सांगितले, की सरकारचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, सरकारच्या प्रकल्पांमध्ये तरुणांचा सहभाग होण्यासाठी याचा उपयोग होत आहे. या प्रकल्पाला दोन वर्ष होत आहेत. या उपक्रमात 20 ते 26 वयोगटातील युवकांना संधी दिली जाते. दोन वर्षांत तरुणांकडून खूप चांगल्या संकल्पना आपल्याला मिळाल्या आहेत, याचा फायदा विविध प्रकल्पांमध्ये होत आहेत. ग्रामिण भागातून येणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे.
या फेलोशिपला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पाच हजार तरुणांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर 2 जुलैला ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. त्यातून मुलाखतीनंतर 50 जणांची निवड केली जाईल. येथे शिकण्याची, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांसह गडचिरोली जिल्ह्यातून अर्ज येत आहे. बाहेरच्या राज्यांतूनही तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे. हा पूर्ण 11 महिन्यांचा उपक्रम असून, त्यांना दरमहिना 40 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, असे विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी क्लिक करा : www.maharashtra.gov.in
कौशल्याच्या शोधात रोजगार
सध्या जगात जास्तीत जास्त आर्थिक वृद्धीचा दर असलेल्या देशांपैकी भारत हा एक आपला देश. आपल्या संपदेत जर दरवर्षी सात-आठ टक्क्यांनी वाढ व्हायची असेल, तर अनेक क्षेत्रांत तरबेज असणारं पूरक मनुष्यबळ देशाला हवं आहे. त्याशिवाय आपला आर्थिक पाया भक्कम होणं अशक्य आहे.
सविस्तर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : http://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptarang-53373
ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
दलितांची कर्जे माफ करावीत : रामदास आठवले
घोषणांच्या पावसात शेतकरी कोरडाच
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी