मतदानादरम्यान कॉंग्रेसचा "वॉच' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या आमदारांची मते सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागतील, अशी चर्चा असल्यामुळे सोमवारी वरिष्ठ नेते विधान भवनात दिवसभर ठिय्या देऊन होते. दिल्लीतून पाठवण्यात आलेले निरीक्षक मनीष तिवारी विधिमंडळ परिसरात सकाळपासूनच दिसत असल्याने कॉंग्रेसचे सर्व आमदार याविषयी आपापसांत चर्चा करत होते. 

मते फुटण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमच्या पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांनी मीरा कुमार यांनाच मते दिली असल्याचे जाहीर केले. कॉंग्रेसचे आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करा, असे आवाहन तिवारी यांनी केले होते. संजय दत्त व अनंत गाडगीळ या दोन विधान परिषद सदस्यांवर कॉंग्रेसचे सर्व सदस्य मतदानाला हजर राहतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Web Title: mumbai news congress