नागरिकांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवण्यात कॉंग्रेसला अपयश 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - महागाई, तीन वर्षांतील विक्रमी पेट्रोल दरवाढ आणि घरगुती सिलिंडरची दरवाढ या प्रश्‍नांवर आवाज उठवत सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याची संधी विरोधी या नात्याने कॉंग्रेस पक्षाने गमावली असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे; मात्र रस्त्यावर उतरून राज्यभरात आंदोलनाचा धडाका लावून सत्ताधाऱ्यांना बचावाचा पवित्रा घेण्यास भाग पाडणे कॉंग्रेसला जमलेले नाही. 

दोन महिने कॉंग्रेस केवळ नारायण राणे आणि त्यांचा भाजप प्रवेश यावरूनच चर्चेचा विषय झाला आहे. राणे यांच्यामुळे राज्यातील कॉंग्रेसकडे अन्य कोणताही विषय नाही, असे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांच्यात वाक्‌युद्ध सुरू असताना कॉंग्रेसने नागरिकांच्या प्रश्‍नावर सरकारला खिंडीत गाठण्याची संधी गमावली आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केले; मात्र निरुपम यांच्यावर नाराज असलेले नेते यात सहभागी झाले नाहीत. कॉंग्रेस पक्षापेक्षा अधिक आक्रमकतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रा वाघ यांनी आंदोलन केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आक्रमकपणे इशारा देत आंदोलन केले. 

Web Title: mumbai news congress bjp Inflation citizen questions