अश्‍लील छायाचित्राद्वारे धमकी देणाऱ्यास अटक

अनिश पाटील
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे मुलींना प्रेमात पाडून त्यांच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या तरुणाला वरळी पोलिसांनी रविवारी (ता. २५) अटक केली. त्याने नुकतीच एका १७ वर्षीय मुलीकडून अशाच पद्धतीने खंडणी घेतली होती. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या माहितीनुसार आरोपीने अशा पद्धतीने पाचहून अधिक मुलींना फसवल्याचा पोलिसांना संशय आहे.

 एप्रिलमध्ये पश्‍चिम उपनगरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला आर्यन सावंत या नावाच्या तरुणाने फेसबुकवर ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवली होती. तिने त्याची ‘रिक्वेस्ट’ स्वीकारल्यानंतर आर्यनने या मुलीसोबत मैत्री केली. मग त्याचे रूपांतर प्रेमात झाले. आर्यनचे वडील वकील, आई शिक्षिका असून तो एका बांधकाम व्यावसायिकासोबत काम करतो, तसेच त्याचे मॉलमध्ये ‘दुकान’ असल्याचेही त्याने या मुलीला सांगितले. 

आर्यनने २६ एप्रिलला मुलीला त्याचा वाढदिवस असल्याचे सांगून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचे छायाचित्रीकरण केले. आर्यनचे खरे नाव सुदर्शन कांबळे असल्याचे मुलीच्या लक्षात आले, याबाबत त्याला जाब विचारला असता त्याने आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. 

पैसे न दिल्यास तिचे अश्‍लील छायाचित्र फेसबुकवर प्रसिद्ध करण्याची धमकी देत आरोपीने तिच्याकडून ८५ हजार रुपये उकळले. त्याने मुलीची अश्‍लील छायाचित्रे तिच्या आईला पाठवून पैसे मागितले, तसेच मुलीच्या चुलत भावाच्या फेसबुकवर तिची अश्‍लील छायाचित्रे पाठवली. मुलीने याप्रकरणी दादर पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेणार असतानाच आरोपीने पळ काढला. त्याला अखेर वरळी नाक्‍यावरून वरळी पोलिसांनी अटक केली. 

Web Title: mumbai news crime