धनगर समाजाचा यंदा जेजुरीला दसरा मेळावा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आणि सोन्याची जेजुरी असा पुराणात उल्लेख आलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथे धनगर समाज बांधवाच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे प्रथमच आयोजन येत्या शनिवारी (ता.३०) करण्यात आले आहे. 

या मेळाव्यास राज्यातून तसेच पर राज्यातील  समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती या मेळाव्याचे आयोजक यशवंत धनगर आरक्षण क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भगवानराव जऱ्हाड यांनी दिली. काही दिवसांपूर्वी धुळे येथील धनगर समाज क्रांती आंदोलनात संघटनेचे पडळकर यांनी सदर दसरा मेळाव्याची घोषणा केली होती. 

धनगर बांधवांना अनुसूचित जाती आरक्षणासाठी विधायक लढा देणाऱ्या  राज्यस्तरीय संघटनेने आतापर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी जंतर-मंतर वर धरणे आंदोलन, पंढरपूर मेळावा, बारामती आंदोलन, विधानभवनावर मोर्चे, पंढरपूर ते बारामती आरक्षण पदयात्रा व सरकारला जाग आणण्यासाठी विविध ठिकाणी पदयात्रा व आंदोलने केली आहेत. तसेच सोलापूर विद्यापीठ नामकरण आंदोलन, धुळे येथील क्रांती आंदोलन, अशा आणि अशा अनेक प्रश्नात जातीने लक्ष घालून त्याच्या सोडवणुकीसाठी सतत पाठपुरावा   सुरू असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

जेजुरी येथील मेळाव्यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सोलापूर विध्यापीठाचे कुलगुरू डॉ. बंडगर, ॲड गुंडेराव बनसोडे, तसेच समाजाचे सर्व आजी-माजी आमदार यांना निमंत्रण देण्यातआल्याचे पडळकर यांनी सांगितले.

यावेळी जेजुरी गडापासुन कार्यक्रम स्थळापर्यंत दिंडी काढण्यात येणार आहे. त्यात खास धनगरी गजीढोल नृत्ये, धनगरी ओव्या, जागरण-गोंधळ गिते, खंजीरी आणि झांज वाद्ये अशा पारंपरिक कार्यक्रमाचा असणार आहे.

Web Title: mumbai news dhangar society dasara campaign in jejuri