आंबेडकर स्मारकासाठी 763 कोटी रुपये मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या 763 कोटी रुपयांच्या कामास "एमएमएमआरडी'च्या बैठकीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली. यामुळे स्मारकाच्या कामास गती येणार आहे. इंदू मिलवरील सुमारे साडेबार एकर जागेवर हे स्मारक होणार आहे. यासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने आपल्या अखत्यारीतील जागा राज्य सरकारला हस्तांतरित केली आहे. या बदल्यात राष्ट्रीय वस्त्रोउद्योग महामंडळाला राज्य सरकारकडून 1413 कोटी रुपये इतक्‍या रकमेचा टीडीआर देण्यात आला होता.

Web Title: mumbai news Dr. babasaheb ambedkar memorial indu mill