आंबेडकर स्मारकाचे काम पुन्हा लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई - दादर येथे इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी एकाच कंपनीने निविदा भरल्याने ही प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. 

मुंबई - दादर येथे इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी एकाच कंपनीने निविदा भरल्याने ही प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी स्मारकाच्या कामाला सुरवात करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) प्रयत्न आहे; मात्र 23 नोव्हेंबरला राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद पाहूनच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे स्मारकाचे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. स्मारकाच्या कामात केवळ शापूरजी पालनजी या कंपनीने स्वारस्य दाखवले. त्यामुळे एमएमआरडीएने ही प्रक्रिया गुंडाळली. आता जागतिक स्तरावरून मागविण्यात आलेल्या निविदा 23 नोव्हेंबरला उघडण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रियेला पुन्हा कमी प्रतिसाद मिळाल्यास त्या न उघडण्याचा एमएमआरएडीए अधिकाऱ्यांचा विचार आहे. डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन 11 ऑक्‍टोबर 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जमिनीची हस्तांतर प्रक्रिया झाली; परंतु स्मारकाची एकही वीट रचली गेलेली नाही.

Web Title: mumbai news Dr. babasaheb ambedkar memorial MMRDA