"ईडी'च्या कारवायांमध्ये साडेआठ पटींनी वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - उद्योगपती विजय मल्ल्या, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल यांच्यावरील कारवाईमुळे चर्चेत आलेल्या सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कामगिरीत 18 महिन्यांत साडेआठ पटींनी वाढ झाली आहे. या कालावधीत देशभरातील सुमारे 14 हजार कोटींच्या मालमत्तांवर "ईडी'ने टाच आणली; तर 78 जणांना अटक केली. 

"ईडी'कडे 33 टक्के मनुष्यबळ आहे. तरीही "ईडी'च्या कामगिरीचा आलेख चढता आहे. 2005 ते 2015 या 10 वर्षांतील कामगिरीवर लक्ष टाकले, तर वर्षाला सरासरी 900 कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली जात होती आणि पाच व्यक्तींना अटक करण्यात येत होती; परंतु 18 महिन्यांत "ईडी'ची कामगिरी साडेआठ पटीने वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 महिन्यांत "ईडी'ने 14 हजार 45 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. म्हणजेच महिन्याला सरासरी 777 कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. याच कालावधीत 39 जणांना अटकही करण्यात आली. 

"ईडी'ने 2014-15 मध्ये तीन हजार 657 कोटींच्या मालत्तांवर टाच आणली. मल्ल्या प्रकरणात आतापर्यंत सहा हजार 600 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. 2005 पासून आतापर्यंत ईडीने एक हजार 51 गुन्हे दाखल केले आहेत; तर 23 हजार 48 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आणि 130 जणांना अटकही केली. 

Web Title: mumbai news ED