"ईडी'ची शाहरुख खानला चार आठवडे मुदतवाढ? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - अभिनेता शाहरुख खानने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात उपस्थित राहण्यास चार आठवड्यांनी मुदत वाढवून मागितली आहे. त्याला "ईडी'ने मान्यता दिली असल्याचे समजते. यापूर्वी परकी चलनविनिमय कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी "ईडी'ने शाहरुखला नोटीस पाठवून 23 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले होते. 

शाहरुखच्या मालकीची रेड चिली ही कंपनी आहे. तिचे समभाग 2008-09 मध्ये अभिनेत्री जुही चावलाचा पती जय मेहताच्या "सी आयलॅंड इन्व्हेस्टमेंट्‌स' या मॉरिशसमधील कंपनीला विकण्यात आले. त्या वेळी त्यांची किंमत आठ ते नऊपटीने कमी करण्यात आली होती. 2011मध्ये "ईडी'ने शाहरुखची 73.6 कोटी रुपयांच्या व्यवहारात परकीय चलन नियमांचा भंग केल्याचा आरोप आहे. 2008 मध्ये रेड चिलीची स्थापना झाली तेव्हा नाईट रायडर्स स्पोर्टस्‌ प्रा.लि चे 9 हजार 900 समभाग "रेड चिली'कडे होते. 

गेल्या वर्षी "ईडी'ने केलेल्या मूल्यांकन अहवालात काही आक्षेप नोंदविले आला होता. त्यानुसार सी आयलॅंड इन्व्हेस्टमेंट कंपनीला नाईट राडर्सचे समभाग देण्यात आले, त्यावेळी प्रत्येक समभागाची किंमत 75 आवश्‍यक होते. मात्र, त्याऐवजी प्रत्येकी दहा रुपयांप्रमाणे ते विकण्यात आले. याप्रकरणी जुलैमध्ये ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्याला उत्तर देताना शाहरुखने नुकतीच मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.

Web Title: mumbai news ED shahrukh khan