'लाखो मुलांनी घेतला फुटबॉलचा आनंद'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई - ई-गॅझेटचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, असे बोधवाक्‍य घेत झालेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन या फुटबॉलच्या महोत्सवास चांगला प्रतिसाद लाभला. या महोत्सवात राज्यभरात २५ लाख मुले-मुली सहभागी झाल्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

भारतात ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी ११ लाखांनी फुटबॉल खेळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यास अनुसरून हा महोत्सव घेण्यात आला. त्यात राज्यातील १६ लाख २९ हजार १७९ मुले, तर नऊ लाख ३३ हजार १७४ मुली असे एकंदर २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या महोत्सवासाठी राज्यभरातील ३३ हजार शाळांत प्रत्येकी तीन फुटबॉलचे वाटप झाले होते. या महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

Web Title: mumbai news football children