"जीएसटी'मुळे एसटीची घरघर वाढणार? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई - जुलैपासून देशभरात जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू केला जाणार आहे. या करामुळे रेल्वेच्या मेल व एक्‍स्प्रेस गाड्यांतील एसी डब्यातील तिकीट शुल्कावर थोडा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. राज्याची जीवनवाहिनी ओळखल्या जाणाऱ्या एसटीवरही याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. एसटीचे सर्व मोठे खरेदी व्यवहार आणि कामकाजाबरोबरच एसी बसच्या तिकिटांवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. एसटीचा इंधन खरेदी, टायर आदींवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. जीएसटीमुळे या खर्चात वाढ होण्याची भीती एसटी महामंडळाला आहे. त्यासाठीच 27 जुनला जीएसटीबाबत बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

भाडेवाढ न केल्याने संकटात 
2014 पासून एसटीची भाडेवाढ झालेली नाही; मात्र त्यानंतर एसटीला डिझेल दरवाढ, टायर व अन्य खर्चाला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जीएसटी एसटीच्या फायद्याचा ठरेल की तोट्याचा, याचा महामंडळ सविस्तर आढावा घेणार आहे. 

Web Title: mumbai news GST MSRTC