कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत बैठक घेणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून झालेल्या फसवणुकीसंदर्भात लवकरच बाजार समित्यांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेऊन सूचना देण्यात येतील, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य संजय सावकारे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. केसरकर म्हणाले, शेतकरी फसवणुकीचे प्रकरण गंभीर आहे. भविष्यात असे फसवणुकीचे प्रकार घडू नयेत, म्हणून बैठकीत सूचना देण्यात येईल. परराज्यातील व्यापाऱ्यांनी सटाणा येथील शेतकऱ्याची 24 लक्ष 26 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद होती. या फिर्यादीनुसार तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एका फरार आरोपीचा तपास सुरू आहे. आरोपींना बॅंकेत खाते उघडण्यासाठी मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
Web Title: mumbai news To hold a meeting on the farmers' deception of onion growers