शिर्डी साईबाबा संस्थानाच्या वतीने सनदी सेवा परीक्षेसाठी मार्गदर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याद्वारे साई पालखी निवारा येथे सुरू करण्यात येणाऱ्या सनदी सेवा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या (आयएएस) अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी संमती दिली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली. या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या ठिकाणी येत्या 1 ऑक्‍टोबरपासून ही प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. या ऍकॅडमीमध्ये 100 प्रशिक्षणार्थींना प्रवेश मिळणार आहे. एका प्रशिक्षणार्थीस एकदाच संधी दिली जाणार असून, प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संपूर्ण माहितीसह श्री साईबाबा संस्थानकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: mumbai news ias exam guidance center