सरकारमधून बाहेर पडण्याचा अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई - केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारबद्दल जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या तो लक्षात येत आहे हे चांगलेच आहे, मात्र केवळ बोलून कसे भागणार, असा प्रश्‍न करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा शिवसेनेला सल्ला दिला आहे.

औरंगाबादेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात त्यांनी सरकारवर टीका केली. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे असे नमूद केले. भाजपविरोधात तयार केल्या जाणाऱ्या महाआघाडीत शिवसेनेने सहभागी व्हावे, अशी इच्छा कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी व्यक्‍त केली आहे.

Web Title: mumbai news maharashtra news ashok chavan politics shivsena government