स्मारकासाठी आराखडा सादर करा - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - सर्वांना प्रेरणा मिळेल असे बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी नगरविकास विभागाने सविस्तर आराखडा तयार करून सरकारला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मलिक आदी या बैठकीस उपस्थित होते. महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून, या स्मारकाची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवायच्या सोयीसुविधा, वाहनतळ आदींच्या अंतर्भावासह सविस्तर आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: mumbai news maharashtra news balasaheb thackeray monument plan devendra fadnavis