सूत गिरण्यांच्या वीज दरासाठी समिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई - वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सूत गिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाऊर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वस्त्रोद्योग विभागाच्या बैठकीत दिली. या वेळी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख हे या वेळी उपस्थित होते.

वस्त्रोद्योग विभागातर्फे सचिव वस्त्रोद्योग अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले. राज्यात 132 सूत गिरण्या असून, वस्त्रोद्योगाचा मुख्य घटक असलेल्या सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक सक्षमपणे चालू शकतात. पारंपरिक ऊर्जेसोबतच सौरऊर्जा व अन्य स्रोतांद्वारे वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात समितीने अहवाल सादर करावा. सूत गिरण्या, साखर उद्योग, रेशीम विकास यांना लागणाऱ्या कुशल व तांत्रिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र संवर्ग करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी वस्त्रोद्योग विभागाला दिले.

Web Title: mumbai news maharashtra news cotton mill electricity rate committee