आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - हर्षल रावते या तरुणाने गेल्या आठवड्यात मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्य इमारतीच्या मधल्या भागात जाळी बसविण्यात आली आहे.

मुंबई - हर्षल रावते या तरुणाने गेल्या आठवड्यात मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्य इमारतीच्या मधल्या भागात जाळी बसविण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी मंत्रालयातच विषप्राशन केले होते. मंत्रालयात घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय योजण्यात येणार आहेत. याचाच भाग म्हणून मंत्रालयात पहिल्या मजल्यावर सुरक्षा जाळी बसविण्यात आली. तसेच आत्महत्या करण्याच्या धमक्‍या देणाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. अशा व्यक्‍ती मंत्रालयात आल्यानंतर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

सध्या मंत्रालयातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर पोलिसांची अतिरिक्‍त कुमक तैनात करण्यात आली होती. जाळीजवळ गेल्यास किंवा जाळीजवळच्या जागेत बसल्यास त्याला तातडीने बाजूला करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मंत्रालय इमारतीत कोणी उडी मारण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी मुख्य इमारतीतील मधल्या चौकात संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. अग्निशामक दलाकडून अशा जाळ्यांचा वापर करण्यात येतो.

धमक्‍या देणाऱ्यांवर नजर
मंत्रालयात विविध खात्यांमध्ये हजारो प्रकरणे प्रलंबित असतात. कामे होत नाहीत म्हणून आत्महत्या करणार, अशा धमक्‍या देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पत्र लिहून अशा व्यक्‍ती धमक्‍या देत असतात. अशी व्यक्‍ती मंत्रालयात आली तर तिच्यासोबत पोलिस बंदोबस्त राहणार आहे.

Web Title: mumbai news maharashtra news mantralaya suicide nest