विशेष नगर वसाहतींचे प्रकल्प लोकाभिमुख होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्यात एकात्मिकृत शहरे विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष नगर वसाहत योजनेच्या विनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या सुधारणांमुळे विशेष नगर वसाहतींचे प्रकल्प अधिक लोकाभिमुख आणि व्यवहार्य होण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार एकात्मीकृत शहरे विकसति करण्यासाठी राज्य शासनाने विशेष नगर वसाहतीचे धोरण मंजूर केले आहे. त्यानुसार खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, किफायतशीर दरात घरे उपलब्ध करणे, गुंतवणूकदारांसाठी योग्य वातावरण निर्माण करणे यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली राज्यातील मंजूर प्रादेशिक योजना, महापालिका-नगरपालिकांच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रस्तावित करून वेळोवेळी त्यामध्ये फेरबदलही मंजूर करण्यात आले आहेत. सर्व प्रादेशिक योजना क्षेत्रात विशेष नगर वसाहती विकसित करण्याबाबतचे विनियम समाविष्ट करण्यात आले आहेत.

Web Title: mumbai news maharashtra news nagar vasahat project People-oriented